बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांच्या सभेला खचाखच गर्दी, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

पुणे | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर राज्यात गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र दुसरीकडे त्यांचेच नेते सूचनेला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. आज शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत.

पुण्यातील शिरूर मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संजय राऊतांनी तिथे उपस्थिती लावली होती. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकीकडे आरोग्य यंत्रणा आपली जीव धोक्यात घालत प्रयत्नांची पराकाष्टा करत अनेक उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे सत्तेतील त्यांचेच नेते केराची टोपली दाखवताना दिसत आहेत.

शिवसेना मेळाव्यामध्ये कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आलं. त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. या कार्यक्रमावेळी बोलताना संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आणि आपला मित्र पक्ष राष्ट्रवादीलाही डिवचलं.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम येथे बंदराचं उद्घाटन केलं. त्यावेळी मनसेने आदित्य ठाकरेंवर टीका करताना, ‘कोण आला रे कोण आला मुख्यमंत्र्यांचंच न ऐकणारा मंत्री आला, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच”

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर अजित पवारांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

‘दीपालीच्या मृत्यूनंतरही छळ सुरुच…’, चित्रा वाघ संतापल्या, पाहा व्हिडीओ

स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राऊतांची तुफान फटकेबाजी, ‘या’ वाक्यांवर शिवसैनिकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More