बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

पुणे | कोरोनाने पुन्हा डोक वर काढत आहे. लस आल्यावर नागरिकांना कोरोनाची पहिल्यासारखी भीती राहिली नाही. त्यामुळे बेजबाबदारपणे नागरिक विना मास्कचे आणि प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन केलं नाही. मात्र या बेफिरीमुळे पुन्हा कोरोना आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 984 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 750 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणासा मुकावं लागलं आहे. तर मृतांमधील 1 रूग्ण हे पुण्याबाहेरील होता.

पुण्यात सध्या 341 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,08,330 इतकी आहे. तर पुण्यात 6689 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4890 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,96,751 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 6743 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘हा’ जिल्हा प्रत्येक शनिवार, रविवार राहणार पूर्ण बंद

“मी कधीही विचार केला नव्हता की देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत बसायला मिळेल”

राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला पैसा….’

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘या’ तारखेला अन्नत्याग आणि पदयात्रा

‘ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅग…’;नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More