बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

पुणे | कोरोनाने देशभरात पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी तर काहींमध्ये नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. वर्दीळीचं शहर असलेल्या पुणे शहरातही कोरोना फोफावत चाललेला दिसत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 727 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 398 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 8 जणांना आपल्या प्राणासा मुकावं लागलं आहे. तर मृतांमधील 2 रूग्ण हे पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 245 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,01,189 इतकी आहे. तर पुण्यात 4253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4887 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,92,089 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 7108 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात 8702 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. नवीन 3744 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2012367 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यात एकूण 64260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.49% झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पूजाच्या आईचा अरूण राठोडबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाल्या…

‘थंडीने गॅसचा दर वाढले’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More