बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

पुणे | कोरोना पुन्हा डोक वर काढत आहे. लस आल्यावर नागरिकांना कोरोनाची पहिल्यासारखी भीती राहिली नाही. त्यामुळे बेजबाबदारपणे नागरिक विना मास्कचे आणि प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन केलं नाही. मात्र या बेफिरीमुळे पुन्हा कोरोना आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 1504 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 13 जणांना आपल्या प्राणासा मुकावं लागलं आहे. तर मृतांमधील 06 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 357 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,13,025 इतकी आहे. तर पुण्यात 8541 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4917 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,96,567 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 8553 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मग सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका- चित्रा वाघ

ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे

भरधाव रिक्षाच्या धडकेनं तरुणी कोमात, 9 दिवस झाले पोलिसांना रिक्षाचालक सापडेना!

‘मी वचन देतो….’; पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

व्हिडीओ शेअर करत प्रियंका चोप्राने दिली गुड न्यूज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More