बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

मुंबई | अनेक लसीकरण केंद्रावर शून्य लसीचा साठा आहे. लसीकरणात नंबर वन असलेल्या महाराष्ट्रात आता लसीकरण पूर्णपणे ठप्प होतं की काय? असं चित्र निर्माण झालंय. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लसीकरण बंद देखील पडलं आहे. आता मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय. मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये कोरोना लसीचे केवळ 160 डोस शिल्लक आहेत.

लसीचा साठा नसल्याने परिणामी लसीकरण केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. बीकेसी केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली असून बाहेर येऊन त्यांना समजावण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. परिणामी लोक वैतागून परत जात आहेत. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी कालच ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली.

ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे.

राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

‘भविष्य मोलाचं पण जीव अनमोल आहे’; ‘एमपीएससी’ पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More