Top News खेळ

आमचे अखेरचे 12 वेदनादायक तास उरलेत, त्यांचा पूर्णपणे आनंद घेऊ- महेंद्रसिंग धोनी

दुबई | 3 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाहीये. प्ले ऑफमध्ये चेन्नईचा समावेश नाही असं इतिहासात पहिल्यांदा घडलंय. यंदाच्या आयपीएलमधील पराभव धोनीने मान्य केला आहे.

गेल्या सामन्यात चेन्नईने चांगला खेळ करत रॉयल चॅलेंजर बंगळूरूवर विजय मिळवला. या विजयानंतर धोनी म्हणाला, “यावेळी संघाची चांगली कामगिरी झाली नाही त्यामुळे नक्कीच दु:ख होतंय. आता या स्पर्धेत आमचे अखेरचे 12 वेदनादायक तास उरलेत, मात्र आम्ही याचा पूर्णपणे आनंद घेऊ.”

“पॉईंट्स टेबलमध्ये आम्ही कुठे आहोत याचा परिणाम होता कामा नये. जर तुम्ही क्रिकेटचा आनंद घेत नसाल, तर ते अत्यंत वेदनादायी होतं. आमच्या संघातील युवा खेळाडूंच्या प्रदर्शनाने खूश असल्याचं,” धोनीने सांगितलंय.

चेन्नईला यंदाच्या वर्षी प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न आल्याने सीएसके संघावर तसंच धोनीवर सोशल मिडियावर फार टीका करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणामुळे रोहित शर्माला वगळलं!

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या