बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेल्या 24 तासांत कोरोनाचा धडकी भरवणारा नवा उच्चांक

नवी दिल्ली |  देशात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मात्र अनलॉकिंग केल्यापासून कोरोनाचे नवे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गेल्या 24 तासांत 11, 929 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्या 24 तासांत आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ कोरोनाग्रस्तांमध्ये झाली आहे. त्यामुळे देशातली एकूण रूग्णसंख्या आता 3 लाख 19 हजार 992 वर जाऊन पोहचली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे 9195 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात सध्या 1 लाख 49 हजार 398 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 62 हजार 379 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती.. जगातील सर्वांत मोठी ट्रायल महाराष्ट्रात!

फक्त विकेंडला लॉकडाऊन… ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी बि-बियाणे अन् खते दिली बांधावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More