महाराष्ट्र मुंबई

धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई |  राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 1666 पोलिस जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 16 पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसंच पोलिस दलातील रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखईल खूप चांगलं आहे. आतापर्यंत 478 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 35 पोलीस अधिकारी आणि 438 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकाल तर….; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

कोरोनाचा शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या