Top News देश

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

नवी दिल्ली | दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातली कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. काल एकाच दिवशी देशात 8 हजार 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख चढत्या क्रमाने पाहायला मिळतो आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवड्याभरा अगोदर भारत 9 व्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.

दुर्देवाची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत देशात 204  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 हजार 598 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब देशात 95 हजार 523 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशात सध्या 97 हजार 581 अ‌ॅक्टीव्ह केस आहेत ज्यांच्यावर देशातल्या विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.19 टक्क्यांवर पोहोचले आहे. 18 मे रोजी हे प्रमाण 38.29 टक्के होते. आतापर्यंत 38 लाख 37 हजार 207 नमुना चाचण्या झाल्या असून दररोज 1 लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या