Top News आरोग्य कोरोना

धक्कादायक! 24 तासांत बीएसएफचे 53 जवान कोरोनाबाधित

नवी दिल्ली | देशभरात अनेक ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढतायत. वैद्यकीय अधिकारी, पोलीस, राजकीय नेते तसंच संरक्षण दलातील जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत बीएफएसच्या 50 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

सीमा सुरक्षा दल्याच्या 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोनावर उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या 345 आहे. शिवाय 659 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आलीये.

बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अगोदर काल चोवीस तासांत 21 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याचप्रमाणे 18 जणांनी कोरोनावर मात केली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात चोवीस तासांत कोरोनामुळे 418 जणांचा मृत्यू झाला असून, 18 हजार 522 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5,66,840 वर पोहचलीये. तर 2,15,125 जणांवर उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या