बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना लागण

नवी दिल्ली | देशात कोरोनानं थैमान घातले आहे. चौथ्या लॉकडाऊननंतर आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील केल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या भलतीच वाढली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 498 कोरोनाबाधित केसेस समोर आल्या आहेत.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 9 लाख 06 हजार 752 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 553 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 3 लाख 11 हजार 565 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5 लाख 71 हजार 460 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्के एवढा झाला आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी 6 हजार 429 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 5 हजार 637 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून पण…., सामनातून टीकेचे बाण

“पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी वागू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More