बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | गेल्या एक महिन्यांपासून सुरू असणारं एसटी कर्मचाऱ्यांचं (ST Employee) आंदोलन (Strike) अद्यापी चालू आहे. परिणामी सरकार (Government) आणि सामान्य नागरिकांसमोरील समस्या वाढत जात आहेत. अशा परिस्थितीतही कर्मचारी विलीनीकरणाच्या प्रमुख मुद्द्यावर ठाम आहेत. अशात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी महत्त्वाची सूचना कर्मचाऱ्यांना दिली आहे.

राज्यातील एकूण 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सरकार या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे. पण कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. ते आज एसटी महामंडळाच्या कार्यालयात बोलत होते.

एसटी कर्मचारी जर सोमवारपर्यंत कामावर हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात येणार आहे. परिणामी सरकारची कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर कामावर हजर राहावं, असं अनिल परब म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या 50 टक्के क्षमता भरली की त्या डेपोतील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. पण काही कर्मचारी कामावर येण्यापासून त्यांना रोखत आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एसटी आंदोलनाच्या काळात एसटी महामंडळाचं तब्बल 550 कोटींचं नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या 

“पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून दाखवा, मग तुम्हाला…”, राऊतांना खुलं आव्हान

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका नाहीतर…”, किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More