भारतातील गेली साडेचार वर्षं असहिष्णुतेची – राहुल गांधी

दुबई | भारतातील गेली साडेचार वर्षं असहिष्णुतेची होती याचा आपल्याला खेद वाटतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते दुबईत अनिवासी भारतीयांच्या कार्यक्रमात बोलत होते.

बेरोजगारी ही भारतातील मोठी समस्या असून आम्हाला त्यावर विजय मिळवायचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

बेरोजगारीवर मात करून युवकांच्या साथीनं आम्ही चीनला आव्हान निर्माण करु शकतो, हे जगाला दाखवून द्यायचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युरोप आणि अमेरिकेत हिंसेचं वातावरण असलं तरी भारतीयांच्या डीएनएमध्ये अहिंसा आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद