बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीनंतर ‘या’ दिवशी दिसणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण

नवी दिल्ली | दिवाळीचा सण संपताच त्या पाठोपाठ आता वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहणही होणार आहे. यंदाची दिवाळी 6 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हा मोठा सण पार पडल्यानंतर पुढच्या काही दिवसांतच 2021 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे महत्वाच्या अशा दोन गोष्टी नोव्हेंबर महिन्यात पार पडत आहे.

यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 11.34 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5.33 वाजता संपणार आहे. पण यंदाचे चंद्रग्रहण भारतात अगदी काही क्षणांसाठीच दिसणार आहे.

भारतात अरूणाचल प्रदेश आणि आसाम राज्याच अगदी काही काळासाठी हे ग्रहण दिसणार आहे. याशिवाय भारतात कोठेही चंद्रग्रहण दिसणार नाही. पण ऑस्ट्रेलिया, अमोरिका, उत्तर युरोपसह पूर्व आशियायी भागात हे ग्रहण दिसणार आहे. भारतात यंदा ग्रहण दिसणार नसल्याने त्याचा सुतकी काळ मानला जाणार नाही.

धार्मिक रूढी आणि मान्यतांनुसार चंद्रग्रहण असो वा सुर्यग्रहण त्याला आपल्याकडे अशुभ मानलं जातं. ग्रहणातील सुतकाबाबतही आपल्याकडे अनेक प्रथा चालत आल्या आहेत. वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होणारं 2021 वर्षातलं हे शेवटचं चंद्रगहण याच महिन्याच्या 19 तारखेला होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“जे 100 कोटींच्या खाली बोलत नाही, त्यांना 5 रुपये कमी केल्याची किमंत काय कळणार”

मुंबईकरांनो आता स्कॅन करा आणि लोकलचं तिकिट मिळवा!

“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटणार”

‘फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत…’;’ WHO ने केेलेल्या दाव्यामुळे जगाचं टेंशन वाढलं

राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, केली ‘ही’ मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More