Top News खेळ

चेन्नईच्या पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना? अखेर धोनीने दिलं उत्तर; म्हणाला…

दुबई | आयपीएलमध्ये आज पंजाब विरूद्ध चेन्नई यांच्यात सामना आहे. चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या सीजनमधील हा शेवटचा सामना आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा देखील हा शेवटचा सामना आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र अखेर यावर धोनीनेच उत्तर दिलं आहे.

पंजाब विरूद्धच्या सामन्यात टॉसच्या दरम्यान अँकर डॅनी मॉरिसन यांनी धोनीला पिवळ्या जर्सीत म्हणजेच चेन्नईकडून हा तुझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो का? असं विचारलं.

डॅनी मॉरिसन यांनी विचारलेल्या या प्रश्नावर धोनीने अजिबात वेळ न घालवता, ‘नक्कीच नाही’ असं उत्तर दिलंय. यावरून धोनीने यापुढे आयपीएल खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनीला आयपीएलबाबातही प्रश्न विचारले गेले होते. अखेर त्या प्रश्नांना आज धोनीने उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे ‘लोकल’च्या प्रश्नावर मात्र कोमात”

“…म्हणून रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न गेलेलंच बरं”

“…म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच”

“राजकारणाचे केंद्र पुण्याला म्हणत राऊतांनीच मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला”

अन् भर सभेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, काँग्रेसला मत द्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या