पुणे | आपल्या पतीच्या उपचारासाठी अनवाणी पायाने मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पारितोषिक पटकावणाऱ्या बारामतीच्या लता करे यांच्या पतीचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झालं आहे. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे. 2013 मध्ये लता करे या पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या होत्या.
सगळेच एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडलं होतं. कडाक्याच्या थंडीत धावल्या आणि पुढे सलग तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ज्येष्ठांच्या श्रेणीत विजेतेपदाची हॅटट्रीक साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती.
दरम्यान, गेल्या सात आठ वर्षात लता करे अनेक मॅरेथॉनमध्ये धावल्या व त्यांनी बक्षीसेही मिळवली पण कोरोनाच्या संकटातून पतीला बाहेर काढण्यात मात्र लता करे यांना अपयश आले. ज्या पतीसाठी इतकी वर्षे मेहनत केली त्या पतीचेच निधन झाल्याने लता करे व कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
थोडक्यात बातम्या-
“नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी आहेत मग लसीकरणाला 30 हजार कोटी का नाहीत?”
‘किमान कोरोना काळात तरी….’; सर्वसामान्यांसाठी सुप्रिया सुळेंनी मोदींकडे केली ‘ही’ मागणी
औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे- रितेश देशमुख
चिंताजनक! कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांना होतंय ‘हे’ गंभीर इन्फेक्शन
ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्दच विसरले मुख्यमंत्री, व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.