Top News

गानसम्राज्ञी लतादीदींनी वाजपेयींना अशी वाहिली स्वरांजली

मुंबई | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांना पित्यासमान माननाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्वीटरवरून स्वरांजली वाहिली आहे. 

वाजपेयी यांना मी पित्यासमान मानायचे आणि त्यांनीही मला मुलीचा दर्जा दिला होता. माझे वडील गेले तेव्हा जितकं दु:खं झालं तितकाच दु:खाचा डोंगर कोसळला आहे’, असं म्हणत लतादीदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘माझे दद्दा अटलजी एक साधुपुरुष होते. हिमालयाएवढी त्यांची उंची होती. गंगेप्रमाणं पवित्र होते. मी त्यांच्या काही कविता रेकॉर्ड केल्या होत्या. त्यातील एक कविता अल्बममध्ये नव्हती. तीच कविता त्यांच्या अर्पण करते,’ असं लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींच्या प्रेमामुळंच मी राजकारणात आलो- धर्मेंद्र

-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या