बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीसह त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का दिला. त्याच्याविषयीच्या भावना कलाकार व्यक्त करीत असून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करून सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. आमची कधी भेट झाली नव्हती, पण त्याने धोनी चित्रपटात खुप सुंदर अभिनय केला होता. जो मी कधीच विसरू शकत नाही. मी त्याला श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो, असं लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांच्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक यांनी सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘अशीच चमकत रहा, तू अशा लोकांपैकी एक…, पाहा आदित्य ठाकरेंनी दिशाला काय दिलाय रिप्लाय!

संजय राऊतांच्या राज ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं आत्महत्या करुन संपवलं जीवन, राहत्या घरी घेतली फाशी…!

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

‘माझं आयुष्य तुम्हाला घ्या’, बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More