बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घाबरू नका, सावध राहा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता दीदींचा सल्ला

मुंबई| कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. काल मुंबईमध्ये कोरोनाचा पहिली बळी गेला. संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे.

आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून योग्य स्वच्छता राखणं आवश्यक आहे, खोकला आणि सर्दी असलेल्यांनी प्रसार टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखलं पाहिजे. आरोग्य संस्थांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा. सुरक्षित आणि निरोगी रहा! त्याचबरोबर त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका असं आवाहन लता मंगेशकर यांनी जनतेला केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी  ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकरनं देशातील जनतेला आवाहन केलं आहे. सचिननं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेश काढले असतील तर ते आदेश रद्द करण्यात येतील. लग्न समारंभावर बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 19वर गेली असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचं जनतेला आवाहन

यांच्या डोक्यावर सॅनिटायझर टाका नाहीतर…- संबित पात्रा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More