बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुंबई | कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेकांनी आता पुढे येत आपापल्या परीने मदत करायला सुरूवात केली आहे. यात काही कलाकारांचाही समावेश आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केलं आहे.

कोविड विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी निर्माण केलाय. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/index ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम जमा करण्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

दरम्यान, देशातील प्रत्येक व्यक्ती शक्य ती आणि शक्य तेवढी मदत करताना दिसत आहेत. कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत.

थोडक्यात बातम्या- 

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, तरुणानं शेअर केला धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More