बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, हैदराबाद पॅटर्न राबवण्याची गरज”

मुंबई | राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सातत्यानं महिलांवर होणाऱ्या वाईट घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधक करत आहेत. वाढत्या महिला अत्याचारावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं आहे.

काल पुण्यात अल्पवयीन मुलीची झालेली अमानुष हत्या ही केवळ चीड आणणारी नव्हे तर आपल्या हतबलतेवर कीव आणणारी आहे. वरचेवर महिला, मुलींचे बलात्कार, खुन करणाऱ्यांची हिम्मत वाढत चालली आहे. कारण गुन्हेगारांना शिक्षा होताना विलंब होत आहे. मध्यंतरी हैदराबाद पोलीसांनी राबवलेला हैदराबाद पॅटर्न राबवण्याची गरज आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

हैदराबाद पॅटर्न राबवला तरच गुन्हेगारांना वचक बसेल. ते म्हणतात ना जस्टीस डिलाइड जस्टीस डिनाइड, या शब्दात नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळा नांदगावकरांच्या या वक्तव्याची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे. पुणे येथे 14 वर्षाय मुलीवर झालेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.

दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी हैदराबाद पॅटर्नचा उल्लेख केला आहे. हैदराबाद पोलीसांनी बलात्कार करणाऱ्या तरूणाचं एनकाऊंटर केलं होतं. देशभरातून हैदराबाद पोलिसांची स्तुती करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या 

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला का जात नाहीत?; समोर आलं ‘हे’ कारण

“तर नेटफ्लिक्सकडून अजित पवारांना 2-3 कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल”

आला रे आला ‘लॉर्ड शार्दुल’ आला! ‘या’ खेळाडूच्या बदल्यात विश्वचषक संघात शार्दुलची एन्ट्री

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More