Menopause | आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांवर, विशेषतः महिलांवर होत आहे. आजच्या काळात अनेक महिला या केवळ चूल आणि मूल सांभाळण्यापुरत्या मर्यादित न राहता करिअरकडेही लक्ष देत आहेत. यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच इतर अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे महिलांवर पडते. याचा परिणाम म्हणून महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे दुर्लक्ष महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येते. मासिक पाळी, गर्भधारणा आणि नंतर रजोनिवृत्ती, ज्याला इंग्रजीत मेनोपॉज असे म्हणतात, हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. नुकत्याच झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, रजोनिवृत्तीला उशीर झाल्याने महिलांना दम्याचा धोका अधिक असू शकतो. (Menopause )
दमा आणि हार्मोन्सचा संबंध
एका नवीन अभ्यासानुसार, ज्या महिलांमध्ये रजोनिवृत्ती उशिरा सुरू होते, त्यांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. दमा हा एक सामान्य आणि जुनाट आजार आहे, जो जगभरातील ३०० दशलक्षाहून अधिक लोकांना प्रभावित करतो. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, महिलांमध्ये असलेले हार्मोन्स दम्याशी संबंधित असू शकतात. लहानपणी दम्याचा धोका मुलांमध्ये जास्त असतो, पण तारुण्यानंतर मुलींमध्ये हा धोका जास्त असतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक गंभीर दम्याने ग्रस्त असतात आणि त्यांच्या आजारातून बऱ्या होण्याची शक्यता कमी असते.
कोणत्या वयोगटातील महिलांना होतो दम्याचा त्रास?
अभ्यासानुसार, लवकर रजोनिवृत्ती आलेल्या ४० ते ४४ वयोगटातील स्त्रियांना दम्याचा धोका कमी असल्याचे आढळून आले, ज्यावरून इस्ट्रोजेनचा दम्यावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याच वेळी, हार्मोन थेरपीचा वापर करणाऱ्या महिलांना दम्याचा धोका ६३ टक्के जास्त असतो. (Menopause )
लठ्ठपणाचा प्रभाव
महिलांमध्ये असलेला उच्च बॉडी मास इंडेक्स (BMI) हा देखील दम्याचा अतिरिक्त धोका असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी इस्ट्रोजेन तयार करते, ज्यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो.
Title : late menopause increases risk of asthma in women study reveals