औरंगाबाद महाराष्ट्र

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

Win prize trophy on wood table with background window.

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दै. मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणार्‍या सकारात्मक लेखन या विषयावरील राज्यस्तरीय पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

राज्यस्तरीय पुरस्कारांसोबत प्रत्येक विभागातून तीन पुरस्कार व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण एका शानदार कार्यक्रमात औरंगाबाद येथे होणार आहे.

दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दै.मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणार्‍या प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली.

पुरस्कारप्राप्त सर्वांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, दै. मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे यांनी अभिनंदन केलं आहे.

पुरस्कार विजेत्यांची नावे-

राजेश टोळ्ये (कार्यकारी संपादक -दै.सुराज्य, सोलापूर), शिवाजी शिर्के (संपादक -दै.नगर सह्याद्री, अहमदनगर), दत्तात्रय देशमुख (जिल्हा प्रतिनिधी – दै.सकाळ) यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. तर मराठवाडा विभागासाठी दिव्य मराठीचे औरंगाबाद प्रतिनिधी संतोष देशमुख, परतूरचे दिव्य मराठी प्रतिनिधी आशिष गारकर, नांदेडचे दै.पुढारीचे प्रतिनिधी विलास गुंडावार यांना जाहिर करण्यात आले आहेत. याच विभागातून प्रोत्साहनपर दै.पुढारीचे परळी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण वाकडे, देशोन्नतीचे परतूर प्रतिनिधी बालाजी ढोबळे, दै.पुढारी औरंगाबादचे राहुल जांगडे, वैजापूर दिव्य मराठीचे शांताराम मगर, बदनापूर दै.सकाळचे आनंद इंदाणी, घनसावंगी दै.पुढारीचे प्रतिनिधी अविनाश घोगरे, सा.जनाई नगरीचे संपादक भागवत जलाले, मुक्त पत्रकार तथा लेखक सचिन स्वामी यांना जाहिर करण्यात आले आहेत. विदर्भ विभागासाठीचे पुरस्कार मीडिया वॉच अमरावतीचे संपादक अविनाश दुधे, देशोन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, दै.लोकमतच्या अकोला आवृत्तीचे वरिष्ठ संपादक विवेक चांदूरकर यांना जाहिर करण्यात आले आहेत. खान्देश विभागासाठी अ‍ॅग्रोवर्ल्ड जळगावचे संपादक शैलेंद्र चव्हाण, महाराष्ट्र टाईम्सचे खान्देश ब्युरो चिफ प्रविण चौधरी, दै.जनशक्ती, जळगावचे कार्यकारी संपादक डॉ.युवराज परदेशी यांना घोषीत करण्यात येत असून, उर्वरित महाराष्ट्रासाठीचे पुरस्कार टिव्ही 9 च्या पुण्याच्या विशेष प्रतिनिधी अश्विनी सातव, पुणे पुढारीचे विशेष प्रतिनिधी दिगंबर दराडे, थोडक्यात न्यूज कोल्हापूरचे कृष्णा वरपे यांना जाहिर करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या