खेळ

‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

वेस्ट इंडिज | क्रिकेटच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नव्हतं, मात्र वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सला चक्क ड्रेसिंगरूम मधून पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आलं.

तिसऱ्या पंचांनी स्टोक्स ज्या चेंडूला बाद झाला होता त्या चेंडूचा रिप्ले बघितला. त्यात गोलंदाजाने टाकलेला चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे दिसले तेव्हा पंचांनी ड्रेसिंग रूममध्ये पोहचलेल्या स्टोक्सला नाबाद असल्याने पुन्हा मैदानात बोलावलं.

स्टोक्स बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पोहचला होता. आणि दुसरा फलंदाज खेळण्यासाठी मैदानात उतरला असताना पंचांनी स्टोक्सला नाबाद ठरवत फलंदाजीला पुन्हा बोलावलं.

दरम्यान, आयसीसीच्या नव्या नियमानूसार नजरचूकीने मैदान सोडले असल्यास खेळाडूला सुट दिली जाते. हा नियम ऑक्टोबर 2017 मध्ये लागू करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला!

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

-“बारामतीसाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या