बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार तिथे शंका, तेव्हा 80 तासांचं सरकार बनलं, आता…”

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्ली येथे भेट झाली व तासभर या नेत्यांमध्ये चर्चादेखील झाली. या भेटीमुळे राजकीय वातावरणात अनेक चर्चांना उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच ही भेट प्रशासकीय भेट नसून राजकीय भेट असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पवार – मोदी भेटीमुळे आता राजकीय विश्लेषकांनी काही तर्क-वितर्क लावले आहेत. शरद पवार यापूर्वी पंतप्रधानांना भेटले तेव्हा महाराष्ट्रात 80 तासाचं अनपेक्षित सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा शरद पवार पंतप्रधानांना भेटल्याने यावेळी राजकारणात काय उलथापालथ होते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितल्याप्रमाणे या भेटीला राजकीय अंग असून ही भेट प्रशासकीय भेट असल्याचं वाटत नाही, कारण पवार आधी पियूष गोयल नंतर राजनाथ सिंह आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले त्यामुळे शरद पवार तिथे शंका ही गोष्ट लक्ष्यात ठेवायला हवी, असं वानखेडे यांनी बोलून दाखवलं आहे. गेल्या काही दिवसात नाना पटोले हे महाराष्ट्रात सत्तेत असताना देखील मित्र पक्षावर टीका करताना पाहायला मिळत आहेत.

नाना पटोले यांच्या टीकेमुळे व अंतर्गत कुरबुरीमुळे आता 2024 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस ऐवजी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या पवार आणि मोदी यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यातच 1 तासात या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे देखील प्रश्न सर्वांना पडले आहेत. यापूर्वी 40 मिनिटे झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पहाटे शपथविधी पार पडला होता. यावेळी नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More