बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. या विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातील तब्बल चार मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन व महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात 53 मंत्री कार्यरत आहेत. तसेच आणखी जास्तीत जास्त 29 नेते मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.

आज तब्बल 43 भाजप नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये पूर्वीच्या काही मंत्र्यांचा  राजीनामा घेऊन त्यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल. तसेच सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांच्या खात्यांचा पुनर्विचार करून त्यांना दुसरी खाती दिली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील यांच्यासह इतरही भाजप नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या मंत्रिमंडळात काही जणांना संधी दिली जाईल, तर काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान नेमका काय निर्णय घेणार व केंद्रीय मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार व कोणते खाते मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More