आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादीची आर्थिक मदत

लातूर | महावितरणच्या जाचामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या उपचारासाठी राष्ट्रवादीने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेतकरी शहाजी राठोड यांच्या पत्नीकडे ही मदत सुपूर्द केली.

वीजबिलासाठीचा तगादा आणि नापिकीमुळे शहाजी राठोड यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राठोड कुटुंबियांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती मात्र त्यांना मदत नाकारण्यात आली, असा दावा अजित पवार यांनी केलाय. 

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाजी राठोड यांची भेट घेतली तसेच सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना उपचारासाठी मदत करावी, अशी मागणी केली. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या