भाजप नगरसेवकाला पोलिसांकडून पट्ट्याने बेदम मारहाण

लातूर | पोलिसांकडून भाजप नगरसेवकाला पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आलीय. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

अजय कोकाटे हे प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रभागात धार्मिक जागेवरुन वाद असल्याने ते याठिकाणी पोहोचले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. 

दरम्यान, लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी याप्रकरणी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे आणि शिवदास लहाने यांची तडकाफडकी बदली केलीय. तसेच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.