महाराष्ट्र लातूर

…म्हणून लोक तहसीलदारालाच मारायला धावले; कोविड केअर सेंटरमधील नागरिकांवर गुन्हा दाखल

लातूर | राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. लातूर जिल्ह्यातही कोरोना आता ग्रामीण भागात शिरकाव करू लागला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मात्र या विलगीकरण कक्षातच तहसीलदारांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातून समोर आली आहे.

तालुक्यातील जाऊ या गावातील कोविड विलगीकरण कक्षात हा प्रकार घडला. तहसीलदार गणेश जाधव कोरोनाची परिस्थिती पाहण्यासाठी गावातील विलगीकरण कक्षात दाखल झाले. मात्र सतत आमची तपासणी का करता? आम्हाला रिपोर्ट का देत नाही? असा सवाल विचारत पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांवरच सेंटरमधील काही लोक धावून गेले.

शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ केल्याप्रकरणी आता आरोपींवर किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा लष्करी, आरिफ पटेल, आतीक पटेल, सय्यद दुरानी आणि सय्यद सुभानी खान या पाच जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची आकडेवारी ११०८ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ५० जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. सध्या ५२५ कोविड रूग्ण जिल्ह्यात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एसटी महामंडळाकडून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित, परिवहन मंत्र्यांचा मोठा खुलासा!

ढोल-ताशा पथकांनाही कोरोनाचा फटका; गणेश मिरवणुका बंद

3 दिवसातील 25 हजारांपेक्षा जास्त नवे रूग्ण, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३ लाखांच्या पार!

“….तेव्हापासून काहींना डोहाळे लागलेत, पण महाराष्ट्रात गोड बातमी नाही म्हणजे नाहीच”

महाराष्ट्र भाजपने राजस्थानसाठी 500 जमवले, सावंतांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या