बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हसतं खेळतं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त; सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरी येताच पतीचाही मृत्यू

मेरठ | मेरठमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 3 जणांचं कुटुंब अवघ्या 3 दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. 3 दिवसांत महिलेचा पती आणि सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महिलेने पती आजारी असल्याकारणाने सासऱ्याच्या मृतदेहावर तिनेच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घरी परतली असता पतीचाही जीव गेल्याचं कळलं. यामुळे महिलेला प्रचंड धक्का बसला आहे. महिलेनं सासऱ्याचे अंत्यसंस्कार केले कारण त्यावेळी पती व्हेंटिलेटरवर होता. परंतु सासऱ्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतच नाही तोवर पतीच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. त्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.

सुरुवातीला महिलेच्या पतीला ताप आला आणि त्यानंतर सासरेही आजारी पडले. नंतर कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालं. 3दिवसांत पहिल्यांदा सासरे आणि त्यानंतर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मेरठच्या कंकरखेडा परिसरात राहणारं हे छोटं कुटुंब आनंदात जीवन जगत होतं. पती मयांक शिक्षक होते तर सासरे निवृत्त कर्मचारी होते. त्यानंतर 3 दिवसांत कुटुंबातील दोन पुरुष गमावल्यानं महिला एकटी पडलीये.

थोडक्यात बातम्या-

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More