बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. अशात नोएडाच्या जलालपूर गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

अतार सिंह यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झालं.

दोन्ही मुलांच्या निधनाने अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पहिल्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच दुसऱ्या मुलाचंही निधन झाल्याने अतार सिंह कुटुंबाला धक्का बसला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडल्याची धक्कादायक घडना घडली. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्येही एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-  

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी

सोशल मीडियावर मुलगा बनून तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, सेक्स टाॅयने ठेवले शारीरिक संबंध

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More