बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंमत कमी आणि दर्जेदार फिचर्स, ‘या’ फोनच्या एन्ट्रीनं बाजारात मोठा धमाका | Lava Blaze Pro

नवी दिल्ली । Lava या भारतीय कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Lava Blaze Pro लाँच केला आहे. चिनी कंपनींनी टक्कर देत हा नवीन फोन Lava कंपनीने ग्राहकांच्या भेटीस आणला आहे. कंपनीने ब्रँड अँबॅसिडर म्हणुन कार्तिक आर्यनची निवड केली आहे. लावाचा हा नवीन फोन कंपनीचे प्रेसिडंट सुनील रैना यांच्यासह कार्तिक आर्यनने लाँच केला.

Lava Blaze फोन कंपनीच्या मागील स्मार्टफोनचे Next Edition आहे. या नवीन फोनच्या फिचर्सबद्दल जाणुन घेऊया. या फोनमध्ये 50MP चा बॅक कॅमेरा आहे. तसेच लावाने ब्लेज प्रो या नव्याने लाँच केलेल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 चा ओक्टा प्रोसेसर बसवण्यात आला आहे.

यामध्ये 6.5 इंच स्क्रीनसह HD+ Notch डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देखील आहे. यासोबतच 10 w चे फास्ट चार्जिंगचे फिचरही आहे.

Lava Blaze Pro मध्ये Triple Camera सेटअप आहे. 50MP चा बॅक कॅमेरा तर 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. फोनमध्ये 4GB नेटिव्ह रॅम आणि 3 GB व्हर्च्युअल रॅम आहे. म्हणजेच एकुण 7 GB रॅम आहे.

आत्ताच लाँच झालेल्या या फोनमध्ये 64GB Internal storage आणि 256GB Expandable memory देण्यात आली आहे. हा फोन Android 12 मध्ये उपलब्ध आहे. शिवाय या फोनला 4G नेटवर्क सपोर्ट देखील आहे.

Lava Blaze Pro हा फोन Glass greeen, Glass orenge, Glass blue, Glass gold या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यासोबत या फोनमध्ये अनलॉकसाठी फेस लॉक, साईड फिंगरप्रिंट स्कॅनर असे फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच Dual Sim, 3.5 mm जॅक आणि टाईप सी चार्चरचे फिचर्सही देण्यात आले आहे.

Lava Blaze Pro ची किंमत 10,499 रुपये इतकी आहे. हा फोन Flipkart, Lava च्या अधिकृत e-store आणि सर्व रिटेल स्टोअर मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या फोनच्या वॉरंटी पिरियडमध्ये जर स्क्रीन डॅमेज झाली तर त्यावर फ्रि रिप्लेसमेंट सर्व्हिस देखील देण्यात येणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More