बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुरेखा पुणेकरांची राजकारणात एन्ट्री; ‘या’ पक्षाचा झेंडा घेणार हाती

मुंबई | सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेची चिंता वाढली आहे. अशातच राजकीय उलाढालही पहायला मिळत आहे. आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. 16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हाती घड्याळ बांधणार आहे.

गेल्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काॅंग्रसेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाच्या बातमीनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा असताना सुरेखा पुणेकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधान आलं होतं. आता अखेर प्रवेश झाला आहे तर तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार.

थोडक्यात बातम्या –  

धक्कादायक! कोरोनामुळे चार वर्षाच्या चिमुकलीचा झोपेतच मृत्यू

शरद पवार सहकुटुंब गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी!

‘सरकारचा गुंडाना धाक राहिला नाही’; श्वेता महाले यांनी सरकारला सुनावलं

सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री; ‘इतक्या’ जागा लढवणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More