३० दिवसांच्या आत विवाह नोंदणी करा, नाहीतर दंड!

नवी दिल्ली | विवाह झाल्याच्या ३० दिवसाच्या आत विवाह नोंदणी करणं गरजेचं आहे नाहीतर प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने दंड होऊ शकतो. केंद्र सरकार लवकरच यासंदर्भात घोषणा करणार असल्याचं समजतंय.

लग्न झाल्यानंतर अनेकजण तत्परतेने विवाह नोंदणी करत नाहीत. यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार हा नियम लागू करणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विवाह नोंदणी अनिवार्य करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचं कळतंय.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या