Lawrence Bishnoi | सध्या देशभरात लॉरेन्स बिश्नोई या नावाची चर्चा आहे. नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) चर्चेत आला आहे. पोलीस हवालदाराचा मुलगा असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने गुन्हेगारीलाच त्याचं जग कसं बनवलं? लॉरेन्स गुन्हेगारी विश्वात कसा आला?, असा प्रश्न सर्वांना पडलाय. पण यामागचं कारण लॉरेन्सची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे.
लॉरेन्सच्या लव स्टोरीचा भयानक अंत त्याच्या गुन्हेगारी विश्वात येण्याचं कारण बनलं. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) त्याच्या गर्लफ्रेंडमुळे गँगस्टर बनला. कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेने लॉरेन्स बिश्नोईचं आयुष्य बदलून गेलं. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात.
ही गोष्टी आहे 2008 साल ची. जेव्हा लॉरेन्स एक सर्वसामान्य आयुष्य जगत होता. शाळेत असताना लॉरेन्स एका मुलीच्या प्रेमात पडला. तेव्हा लॉरेन्सच्या दिसण्यावर अनेक मुली भाळल्या होत्या. मात्र लॉरेन्स एका मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पुढे त्या मुलीचाही लॉरेन्सवर जीव जडला. तिचंही त्याच्यावर भरपूर प्रेम होतं.
लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत
शाळेतलं प्रेम कॉलेजमध्ये पोहोचलं. दोघेही चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत होते. या दरम्यान लॉरेन्सच्या आयुष्यात एक वादळ आलं. ते म्हणजे कॉलेजची निवडणूक. लॉरेन्स कॉलेजमध्ये त्याचा ग्रुप तयार केला. लॉरेन्स कॉलेजमध्ये हळूहळू प्रसिद्ध होत गेला. मात्र लॉरेन्सची ही प्रसिद्धी लॉरेन्सच्या दुसऱ्या ग्रुपला पचली नाही. या दरम्यान कॉलेमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) देखील उभा राहिला होता. पण यात दुसरा गट विजयी झाला. यानंतर दोन्ही गटांमधील खुन्नस वाढत गेली.
दुसऱ्या ग्रुपने लॉरेन्सला टार्गेट बनवलं होतं. दुसऱ्या गटाने लॉरेन्सला उद्ध्वस्त करायचं ठरवलं. अशात लॉरेन्सचा जीव असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याची बातमी आली.
गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर
लॉरेन्सच्या गर्लफ्रेंडला (Lawrence Bishnoi) जिवंत जाळलं गेल्याची माहिती आहे. यानंतर बदल्याच्या भावनेने लॉरेन्सने विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांवर गोळीबार केला. इथूनच लॉरेन्सने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं.
महत्त्वाच्या बातम्या-
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, दिवाळी गोड होणार
एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!
….अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार!
World Food Day! महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ तुम्हाला माहितेय का?
बाबा सिद्दीकी नाहीतर सलमान खान होता टार्गेटवर?, ‘त्या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ