औरंगाबाद | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता.
या दसरा मेळाव्यात भारताचा आपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भारत देशाची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या दहशतवादी आणि मुस्लिम राष्ट्राशी केली. त्यामुळे या तुलनेनं भारताचा अपमान झाला आहे. याचप्रमाणे हिंदुत्वाचा त्याग करून त्यांनी राज्याची सत्ता संपादन करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दु:खवल्याचाही आरोप तक्रारदारकडून करण्यात आला आहे.
राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगणा राणावतवरून निर्माण झालेला वादंग अशा मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आक्रमक शैलीत समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या-
“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”
‘राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने…’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना चिमटा
“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”
‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक
‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा
Comments are closed.