बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लाॅकडाऊन करण्याची वेळ आली. या काळात सरकारी कामे देखील ऑनलाईन होत होती. अनेकांनी घरून काम केलं. ऑफिसच्या मिंटीग सुद्धा ऑनलाईनच व्हायच्या. या ऑनलाईन मिटींगचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

कोर्टाचे ऑनलाईन कामकाज चालू असतानाचा हा व्हिडीओ आहे. श्रत्रसाल राज नावाचा वकिल हातात प्लेट घेऊन जेवणाचा आनंद घेत होता. परंतू सूनावणी चालू आहे याचं त्याला भान राहिलं नाही. यामध्ये भारताचे साॅलिसीटर जनरल तुषार मेहता देखील उपस्थित होते. पटनाच्या उच्च न्यायालयात चाललेल्या एका सुनावणी दरम्यान हा किस्सा घडला.

काॅलचा आवाज म्युट असल्याने बाकीच्या वकिलांचा आवाज श्रत्रसाल यांच्यापर्यत पोहचला नाही आणि ते खातच राहीले. शेवटी तुषार मेहता यांनी श्रत्रसाल यांना काॅल केला आणि तुम्ही ऑनलाईन दिसत असल्याचं सांगितलं. ही गोष्ट लक्षात येताच श्रत्रसाल यांनी लगेच प्लेट खाली ठेवली आणि गंभीरपणे काॅमेराकडे बघू लागले.

दरम्यान, तुषार मेहता यांनी इधर भेजो म्हणत श्रत्रसाल यांची फिरकी घेतली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फक्त हाच नाही तर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेक लोक मिटींग चालू असताना भाजी चिरताना दिसत होते. तर काही लोक गाणी गाताना दिसतात.

 

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसनं कर्नाटकाला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकाला Porn Hub बनवतंय”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More