नवी दिल्ली | कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातच जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
कृषी कायद्यांना स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा ओलांडली असल्याचं, बापट यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोह यांसारखे कायद्याचे विषय न्यायालयापुढं आहेत. मात्र तात्काळ कृषी कायद्यांना स्थगिती दिली गेली. अचानक एवढी तत्परता न्यायालयात आली कोठून, असा सवालही बापट यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकारच्या नविन कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी गेल्या दिड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकार यावर कोणताच तोडगा काढत नाहीय.
थोडक्यात बातम्या-
मोदी सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत”
‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा
हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे
सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!
ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!