chhagan bhujbal | महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूर येथे पार पडला. यात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यानंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भुजबळ उपमुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. ओबीसींची ठाम भूमिका घेणारी माणसे मंत्रिमंडळात हवी होती. याबाबत मी भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. आता त्यांना मंत्रीपद मिळालं नाही, पण कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, असा सकारात्मक विचार आम्ही करत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके यांचं मोठं वक्तव्य
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी आहेत. आता भुजबळ उपमुख्यमंत्री होणार म्हटल्यावर अजितदादा आपलं उपमुख्यमंत्री पद सोडणार काय?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.लक्ष्मण हाके यांनी थेट असं वक्तव्य केल्याने राजकारणात आता वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
दरम्यान, भुजबळ (chhagan bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आज छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, नाराजीच्या चर्चेवर आज स्वतः भुजबळ (chhagan bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असं ते पत्रकरांना म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहे. त्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो का नाही?, असा सवाल देखील माध्यम प्रतिनिधींनी भुजबळ यांना केला. त्यावर त्यांनी बॅनरवर जागा नसेल, असं खोचक उत्तर दिलं.
तसेच, मला मंत्रिमंडळात का घेतले गेले नाही, हे त्यांना विचारा. पक्षाच्या नेत्यांना विचारा. त्याचे उत्तर मी कसे देऊ, असंही भुजबळ म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून ते कमालीचे नाराज असल्याचं दिसून येतंय. आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
News Title : Laxman Hake big statement on chhagan bhujbal
महत्वाच्या बातम्या –
मंत्रीमंडळात संधी हुकली, रवी राणा कमालीचे नाराज?; चर्चेला उधाण
अधिवेशनात ‘या’ मुद्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार?
“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य
मंत्रीमंडळात डावलल्याने छगन भुजबळ नाराज, घेणार मोठा निर्णय?
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रीपद नेमकं कुणाला?