मोठी बातमी! ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक

Laxman Hake Health | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडे सगेसोयेरेची मागणी केली. यासाठी आता सरकारने एका महिन्याचा अवधी मागितला आहे. मात्र अशातच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी काही खाल्ल नाही. तसेच मागील दोन दिवसांपासून त्यांनी पाण्याचा घोट देखील घेतला नसल्याने लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक (Laxman Hake Health) झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक

लक्ष्मण हाके हे वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या उपोषणाचा पाठिंबा वाढत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी घेणं बंद केलं असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक (Laxman Hake Health) असल्याची माहिती समोर आली आहे. रक्तदाब वाढत असल्याने हाके यांना ईसीजी लावला आहे. अशातच आता कार्यकर्त्यांकडून पाणी पिण्यासाठी मोठा आग्रह केला जात आहे.

ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांनी उपोषण केलं आहे. त्यांनी 5 दिवसांपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. अशातच गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केलं आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेंची प्रकृती बिघडल्याचं (Laxman Hake Health) दिसून आलं आणि अशक्तपणा देखील आला. लक्ष्मण हाकेंच्या शरिरातील साखर आणि पाण्याची पातळी खालावल्याचं दिसून आलं आहे. त्यांना चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या उपचारासाठी आग्रह करण्यात आला.

हाकेंनी उपचार घेण्यापासून नकार दिला आहे. तसेच हाकेंनी औषध घेण्यासाठी तसेच सलाईन घेण्यासाठी देखील नकार दिला आहे. यामुळे उपोषण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे. (Laxman Hake Health)

उपोषणाचा आजचा सहावा दिवस

लक्ष्मण हाके यांच्यासोबत त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी देखील उपोषण केलं आहे. त्यांच्यादेखील उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दरम्यान उपोषणास्थळी मुंडे बंधु भगिणीने देखील भेट घेतली आहे.

दरम्यान, उपोषणास्थळी बीडचे मालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या भगिनी पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडेंनी माझ्या भावांच्या उपोषणातील मागण्यांचा सरकारने विचार करावा, आणि मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, हे समजावून सांगावं, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे.

News Update – Laxman Hake Health Update

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक

महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”