Laxman Hake l राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलंच चर्चेत आहे. ओबीसी आरक्षण बचाव करण्याची लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. अशातच आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अन्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज पुणे आणि जालना येथे बसलेल्या वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट देणार आहेत.
Laxman Hake l आज लक्ष्मण हाकेंची शिष्टमंडळ भेट घेणार :
ओबीसी आरक्षणावरून रान उठवलेल्या लक्ष्मण हाके यांची आज शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेची भेट घेणार आहे.
या शिष्टमंडळात पाच मंत्री, एक आमदार व एक माजी आमदार असणार आहे. हे शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड.मंगेश ससाणे यांची भेट देखील घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जाऊन भेट घेणार आहेत.
लक्ष्मण हाकेंची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात कोण-कोण? :
मंत्री छगन भुजबळ
मंत्री अतुल सावे
मंत्री गिरीश महाजन
मंत्री उदय सामत
मंत्री धनंजय मुंडे
मंत्री संदीपान भुमरे
माजी आमदार प्रकाश शेंडगे
आमदार गोपिचंद पडळकर
जालना येथील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षणासंबंधी सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. तसेच सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त करत त्याला विरोध केला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे.
News Title – Laxman Hake Jalna Hunger Strike
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…
लक्ष्मण हाकेंचं उदाहरण देत पंकजा मुंडेंचा जरांगेंना टोला, म्हणाल्या…
लक्ष्मण हाकेंनी काढली मनोज जरांगेंची लायकी, म्हणाले…
‘मी त्या जातीतली…’; मराठी सिनेसृष्टीबाबत माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा