पुणे | वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. ते 12 एप्रिलला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
सध्याच्या परिस्थितीत मला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शरद पवार हे माझ्या समाजासाठी मोठा आधार वाटतो. त्यामुळे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात लढण्यासाठी मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मण माने यांनी पुण्यात स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्र सरकार नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी या निर्णयामुळे आमचं नागरिकत्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी वाड्या वस्त्यांवर भटक्या विमुक्त वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाईल, असं माने यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या यात्रेला 12 मार्चला कराडपासून होणार आहे. यात्रेचा शेवट 12 एप्रिल रोजी बारामतीत होईल. त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं माने यांनी सांगितलंय.
ट्रेंडिंग बातम्या-
रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…
झेंड्यात राजमुद्रा वापरणं राज ठाकरेंना महागात; राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस!
महत्वाच्या बातम्या-
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
‘माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला, मला गोळ्या झाडा’, हिंगणघाट प्रकरणातील आरोपीची मागणी
“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”
Comments are closed.