Laxmi Dental IPO | लक्ष्मी डेंटल कंपनीचा (Laxmi Dental IPO ) आयपीओ (IPO) शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध झाला आणि गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी घसघशीत नफा झाला. 428 रुपये किंमत असलेला हा आयपीओ (IPO) 542 रुपयांवर सूचीबद्ध झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना प्रति शेअर 114 रुपयांचा फायदा झाला.
लिस्टिंगनंतर, लक्ष्मी डेंटलचा (Laxmi Dental) शेअर आणखी तेजीत आला आणि 584 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ज्या गुंतवणूकदारांनी या उच्चांकी पातळीवर शेअरची विक्री केली, त्यांना प्रति शेअर तब्बल 156 रुपयांचा नफा झाला. एकूणच, लक्ष्मी डेंटलच्या (Laxmi Dental) आयपीओने (IPO) गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे.
आयपीओला (IPO) उदंड प्रतिसाद
लक्ष्मी डेंटलचा (Laxmi Dental) आयपीओ (IPO) 13 ते 15 जानेवारी दरम्यान बोली लावण्यासाठी खुला होता. या तीन दिवसांत गुंतवणूकदारांनी या आयपीओला (IPO) उदंड प्रतिसाद दिला. एकूण 698.06 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आलेल्या या आयपीओला (IPO) 114.16 पट अधिक बोली प्राप्त झाली.
या आयपीओमध्ये (IPO) कंपनीने 138 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले होते, तर 560.06 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer For Sale) अंतर्गत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) देखील कंपनीने 314 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली होती. (Laxmi Dental IPO )
गुंतवणूकदारांची पसंती
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण पाहायला मिळाली. असे असतानाही लक्ष्मी डेंटलच्या (Laxmi Dental) आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Institutional Investors) 110.38 पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Non-Institutional Investors) 148 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी (Retail Investors) 75 पट अधिक बोली लावली.
यावरून लक्ष्मी डेंटल (Laxmi Dental) कंपनीच्या व्यवसायाबद्दल आणि भविष्याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेला विश्वास दिसून येतो. (टीप – शेअर बाजार (Share Market), म्युच्युअल फंड (Mutual Fund) हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखाचा उद्देश गुंतवणुकीसाठी शिफारस करणे किंवा सल्ला देणे नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.) (Laxmi Dental IPO )
Title : Laxmi Dental IPO Lists With Bumper Gains