बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; समोर आलीय ही धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनासाठी 50 हजार करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी केलेल्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं आणखी वाढलं आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 103 टक्के पाऊस होणार!

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, म्हणतात…

माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत त्याने तरूणीसोबत केलं धक्कादायक कृत्य!

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांंना जितेंद्र आव्हाडांचा टोला, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More