बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

नांदेड | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय फटकेबाजी रंगली आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे जोरदार प्रचार सभांचं आयोजन केलं जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभेला संबोधित करताना चांगलीच फटकेबाजी केली आहे.

प्रचार सभांमध्ये अनेक प्रकारची आश्वासनं दिली जातात. राजकीय नेत्यांच्या आश्वासनांनी प्रचार सभा गाजत असतात. आताही चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक खास आश्वासन दिलं आहे. तुमच्या गावातून भाजपला आघाडी द्या मी तुम्हाला गाव जेवण देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील आपल्या आगळ्या-वेगळ्या वक्तव्यांनी नेहमीच राजकारणात रंगत आणतात. आताही पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात भरपूर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना आपण गाव जेवण देणार आणि मी स्वत: या जेवणाच्या कार्यक्रमाला जेवायला येणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दोन्हीकडील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळत आहेत. काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना आपला गड राखण्याचं आव्हान देखील आहे. तर भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला खिंडार पाडलं आहे. परिणामी भाजपसाठी ही लढाई महत्वाची आहे.

थोडक्यात बातम्या 

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More