महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

मुंबई | उद्धवजींच्या विधानपरिषदेचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करु नये असं वाटतंय, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धवजी मुख्यमंत्री कायम राहू होऊ नये, या वातावरणात आघाडीत कोण बैठका घेत आहे, दिल्लीत कोण बैठका घेत आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं.

एक दिवसाचा राजीनामा देऊन पुन्हा त्यांना शपथ घेता येणार नाही. त्यानंतर मग ज्याच्यासाठी प्रयत्न चालू होते, त्यांना पुढे करता येईल, असं महाविकास आघाडीचं राजकारण सुरु आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, आघाडीमध्ये ताळमेळ नाही. राज्यपाल नियुक्त सदस्यचा ठराव करण्याचं कायदेशीर ज्ञान नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठराव केला. मात्र ते घटनात्मक पद नसून ते राजकीय पद आहे. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो ठराव होतो तोच ठराव असतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

वांद्रेची घटना सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडवली गेली- संजय राऊत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या