बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप यशापयशाची पर्वा न करता ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत चालला आहे. सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आलं आहेत. त्यामुळे भाजपतर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. तसेच या जागांवर भाजप यशापयशाची पर्वा न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल, अशी घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विश्वासघाताच्या विरोधात भाजपच्यावतीने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते यात सहभागी झाले आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान,  ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आलं आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले आहेत. तर नागपूरमधील मानेवाडा चौकात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More