बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहे. अलिकडील राजकीय घटना पाहिल्या तर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सतत आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. तसेच भाजप हा उपऱ्यांचा पक्ष असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘माझं संजय राऊत यांना थेट आव्हान आहे. शिवसेनेमध्ये उपऱ्यांची संख्या आणि भाजपमध्ये उपऱ्यांची संख्या मोजा. ही आकडेवारी जनतेसमोर एकदा येऊ द्या. आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांचं वर्चस्व असणाऱ्यांची आहे. उदय सामंत मूळचे शिवसैनिक आहेत का? अब्दूल सत्तार 1966 चे सैनिक आहेत का?’, असा सवालही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

‘शंकरराव गडाख, प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर कोण आहेत? अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांनी भरलेलं असताना व्यापारी प्रवृत्तीला महत्व येत असताना भाजपवर उपऱ्यांना घेता का?, असा आरोप करणं किती सयुक्तिक आहे?’, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे खुद्द शरद पवारांनाही रोज झालेल्या त्याच त्याच विषयांसाठी पत्रकार परिषदा घ्यावा लागत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांच्या चर्चा करून चोथा झालेल्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या गैरवापराची ढोलकी वाजवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय, असंही प्रविण दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अमेझाॅनचं पार्सल पोहोचवणारा मुलगा ते विश्वचषकातील सामनावीर स्काॅटलंडच्या खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास

आरोग्य विभागाच्या वादात मंत्री बच्चू कडू यांची उडी, राज्य सरकारला दिला घरचा आहेर

बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेमने मोडले सारे रेकॉर्ड्स! तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्सची कमाई

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More