बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

मुंबई | नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या (Navi Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज बैठक घेतली. यावरुनच आता भाजप (BJP) जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत(Ramchandra Gharat) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) ताशेरे ओढले आहेत.

महानगर पालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक (Ganesh Naik) यांना शह देण्यासाठी आघाडी सरकार एकत्र येणार असल्याचं, आज झालेल्या बैठकीतनंतर काही नेत्यांनी सांगतिलं. स्वबळावर निवडणुका लढणारे आघाडी सरकार भाजपला घाबरले असल्याचं भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत (Ramchandra Gharat) यांनी म्हटलं आहे.

पुढे घरत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बिथरले आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसं लढायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र नवी मुंबईचा विकास फक्त भाजपच करू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असं रामचंद्र घरत म्हणाले आहेत.

दरम्यान, येणऱ्या महानगर पालिका निवडणुकीl काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आतपासूनच निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत असून आरोपांची मालिका सुरुच आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ आठ जणांना मिळणार तिकीट

‘अविवाहित लोकांच्या हातात देश आहे आणि ते…’; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, अन्यथा…

‘…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More