पुणे महाराष्ट्र

“मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती आहे”

पुणे | देशातील मोदी सरकारमधील नेत्यांना 25 वर्षाच्या एखाद्या नेत्याची भीती असते, अगदी तशीच भीती 80 वर्षांच्या शरद पवार यांची आहे, असं वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

शेतकरी जगला तर आपण जगू म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, आणि शेती करत नसला तरीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन धनजंय मुंडे यांनी केलं.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन करण्यात आले. यावरून धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल त्यांना श्रवणाखाली द्यायला हवी? कारण, त्याची मशीन अद्याप निर्माण झालेली नाही अशा वेळी हाताचा वापर करावा लागतो, असा टोला धनजंय मुंडे यांनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

2020 मध्ये ‘कोरोना’ नव्हे तर ‘हा’ शब्द ॲानलाईन डिक्शनरीत सर्वाधिक शोधला गेला!

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या…

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या